मुंबई

जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही

CD

जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही
वार्तालाप कार्यक्रमात मंगेश वाकडीकर यांचे ठोस व्हिजन
पनवेल, ता. २९ (बातमीदार)ः पनवेल तालुका पत्रकार विकास मंचतर्फे वार्तालाप कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी विविध विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. रविवारी (ता. २९ ) झालेल्या या कार्यक्रमात मंचच्या सदस्यांनी वाकडीकर यांचा सत्कार करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना मंगेश वाकडीकर यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील सुमारे ७०० अंगणवाड्यांमध्ये अद्याप विद्युत जोडणी नसल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. हा विषय आम्ही प्राधान्याने हाताळणार असून, जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय जलजीवन मिशन, जलदुर्ग संवर्धन, सागरी पर्यटनाला चालना, ऐतिहासिक वारसा स्थळांचे सुशोभीकरण आणि आरोग्य सुविधा या विषयांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंचातील पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण आणि सखोल उत्तरे देत आपली दूरदृष्टी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सल्लागार मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमास मंचचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, उपसचिव राजू गाडे तसेच नीलेश सोनावणे, प्रवीण मोहोकर, लालचंद यादव, सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोट :
मी कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्रात काम केल्याने मला व्यवस्थापनाचा अनुभव आहे. विविध जनकेंद्रित उपक्रम राबविण्याचा अनुभव माझ्याकडे आहे. क्रीडा क्षेत्रातही रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून काम केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक काम करीत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या पाठबळावर निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करेन.

- मंगेश वाकडीकर,
अध्यक्ष-जिल्हा परिषद रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: अजिंक्य रहाणेची आक्रमक खेळी; मुंबईच्या मदतीला 'लॉर्ड' शार्दूल धावला, तरीही KKR ने उभे केले आव्हानात्मक लक्ष्य

पाचवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द; महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल, कुणी घेतला निर्णय?

लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड, बोर व्याघ्र प्रकल्पात नोंद; अभ्यासकांमध्ये आनंद

SCROLL FOR NEXT