

Karnataka cm
esakal
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. एका बाजूला काँग्रेसमध्ये राज्यात नेतृत्वबदलाच्या हालाचाली सुरू असताना दुसरीकडे राज्यपाल थावरचंद गहलोत हे राजधानीत नसल्यानं पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अद्याप काँग्रेस किंवा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेतृत्वबदल आणि राजीनाम्याबद्दल काही सांगितलेलं नाही. पण सिद्धरामय्या राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.