मुंबई

दाेन काेटी वाहनांचा ‘अटल सेतू’वरून प्रवास

CD

दाेन काेटी वाहनांचा
‘अटल सेतू’वरून प्रवास

सव्वादोन वर्षांत चारचाकी वाहने सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या अटल सेतूवरून प्रवास वेगवान झाला आहे. जवळपास २६ महिन्यांत शुक्रवारपर्यंत या मार्गावरून तब्बल दाेन कोटी ३१६ वाहनांनी ये-जा केली आहे. यात सर्वाधिक एक कोटी ८१ लाख चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

मुंबईतून नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई उपनगरासह नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पाऊण तासांच्या प्रवासासाठी दोन-अडीच तास लागत हाेते. देशातील सर्वात लांब शिवडी- न्हावा- शेवादरम्यान उभारलेल्या सागरी सेतूमुळे हा वेळ खूप कमी झाला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे. एक कोटी ८१ लाख ९५ हजार ७१८ खासगी चारचाकी वाहनांनी म्हणजे एकूण वाहनांच्या तुलनेत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक वाहनांनी या पुलाचा वापर केला आहे. पाच लाख ९८ हजार ५२५ छाेटी व्यावसायिक वाहने, मिनीबस, बस आणि ट्रकची, तर १२ लाखांहून अधिक मध्यम, जड आणि अति-अवजड वाहनांच्या वाहतुकीची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT