कांद्यांचे दर घसरले
हॉटेल व्यवसाय बंदचा परिणाम
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः एलपीजी गॅसचा तुटवड्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील ७० ते ७५ टक्के हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा बाजार येथे दिसून येत आहे. उठाव नसल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले असून मोठ्या प्रमाणात माल साठून पडला आहे.
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा कांद्याचा वापर थांबला आहे. परिणामी घाऊक बाजारात आलेल्या मालाला अपेक्षित मागणी मिळत नसून व्यापाऱ्यांचा माल विक्रीविना साठून राहत आहे. किरकोळ बाजारातही मर्यादित खरेदी होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्याच्या घडीला आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने दरावर दबाव कायम आहे. या परिस्थितीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण वाढत आहे.
कांद्याचे सध्याचे दर प्रति किलो
पांढऱ्या कांद्याला १५ ते २० रुपये किलो दर मिळत आहे. महाराष्ट्रातील नं. १ कांदा १३ ते १५ रुपये, नं. २ कांदा १० ते १२ रुपये दराने विकला जात आहे. बिनपातीचा सुका कांदा ६ ते ८ रुपये, तर बिनपातीचा ओला कांदा ४ ते ६ रुपये दराने मिळत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.