मुंबई

श्रीराम नगरात रामनवमी सोहळा दिमाखात साजरा

CD

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : कॅम्प ४ येथील श्रीरामनगरमधील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. चैत्र वद्य नवमीनिमित्त दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. श्रीराम भजनी मंडळाच्या भजनांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले, तर पारंपरिक पाळणा गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. प्रभूंच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत उपस्थितांना सुंठवडा व प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी श्रीरामनगर उत्सव समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले रामभक्त, ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या साक्षीने शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत होते. ठिकठिकाणी रांगोळ्या व पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सोहळ्यात शिवसेना नगरसेवक अरुण आशान, इंदिरा पाटील, संगीता सपकाळे, माजी महापौर लीलाबाई आशान, समाजसेवक निखिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT