मुंबई

घोडबंदरवासियांची सकाळ घामाघूम - साडेपाच तास वीज पुरवठा खंडीत

CD

घोडबंदरमध्ये वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः घोडबंदरमध्ये सुट्टीच्या दिवशी नागरिकांना एका वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. आज सकाळी सहाच्या सुमारास ठाणेकर झोपेत असताना शहरातील घोडबंदर रोड, वसंत विहार आणि आसपासच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. थोड्या वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल, या अपेक्षेत असताना त्यासाठी तब्बल साडेपाच तास वाट पाहावी लागली.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वाशी परिमंडळात आज सकाळी पडघे-वाडा वीजवाहिनीवर क्षमतावाढीसाठी कुडूस उपकेंद्र जोडणीचे काम सुरू होते. याचदरम्यान पातलीपाडा येथील उपकेंद्राशी संबंधित पडघा-कांबा-खारबाव-कोळशेत ही वीजवाहिनी ट्रिप होऊन ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गुल झाली. यात कोलशेत परिसर, घोडबंदरचा शहरी भाग तसेच वाडा येथे वीजपुरवठा खंडित करावा लागल्याची माहिती महावितरणने दिली.
या बिघाडानंतर महापारेषण आणि महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. काही भागांत पर्यायी मार्गाने टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. अखेर सकाळी ११.३० वाजेपर्यंत सर्व भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. दरम्यान, दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने वागळे इस्टेट, वसंत विहार, घोडबंदर रोड, ओवळा आणि कोलशेत परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT