मुंबई

विस्तार मेटल कंपनीत एसीचा स्फोट तीन कामगारांचा मृत्यू

CD

विस्तार मेटल कंपनीत एसीचा स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

वाडा, ता. २९ (बातमीदार) ः आबिटघर गावातील विस्तार मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एसी दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री ११च्या सुमारास घडली.
मोहम्मद अली अन्सारी (३२), अखिलेश जैस्वाल (४५), किसन निकम (४५) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. एसी दुरुस्तीचे काम सुरू असताना एसीच्या काॅम्प्रेसरचा अचानक स्फोट होऊन त्यातून निघालेली आग तिघांच्या अंगावर आल्याने ते गंभीररीत्या भाजले. त्यानंतर त्यांना वाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT