मुंबई

ई-गव्हर्नन्स व सेवाकर्मी प्लसमध्ये एमपीसीबीचा झेंडा

CD

प्रशासकीय सेवेत टिटवाळ्याचा डंका
प्रमोद नांदगावकरांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
टिटवाळा, ता. ३० (वार्ताहर) : राज्य सरकारच्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ आणि ‘सेवाकर्मी प्लस’ उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. या मोहिमेत मंडळाने ई-गव्हर्नन्समध्ये पाचवा, तर सेवाकर्मी प्लसमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशात मोलाचा वाटा उचलणारे टिटवाळ्याचे सुपुत्र आणि प्रशासकीय अधिकारी प्रमोद नांदगावकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सोहळ्यात प्रभारी सदस्य सचिव अभय पिंपरकर आणि प्रमोद नांदगावकर यांनी हे प्रशस्तिपत्र स्वीकारले. प्रशासनातील पारदर्शकता आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची ही फलश्रुती मानली जात आहे.

प्रमोद नांदगावकर यांनी केवळ सरकारी सेवाच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रेड स्वस्तिक’ संस्थेच्या माध्यमातून राज्यभर विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता अभियानात त्यांनी ‘स्वच्छता दूत’ म्हणून काम करत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. टिटवाळा परिसरातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘गंधर्व ग्रुप’च्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.प्रशासकीय शिस्त आणि सामाजिक भान जपत नांदगावकर यांनी मिळवलेल्या या यशामुळे टिटवाळा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT