वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
बोईसर (वार्ताहर): डहाणू तालुक्यातील देढणपाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसोबत तितिष्का घरतने वाढदिवस साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासोब शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता.