मुंबई

रामबाग परिसरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

CD

रामबाग परिसरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

​कल्याण, ता. ३० (बातमीदार) : गजबजलेल्या रामबाग लेन क्रमांक ४ परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. भरदिवसा इमारतींच्या आवारातून दुचाकी पळवल्या जात आहेत. नुकतीच घडलेली एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

रामबाग लेन ४ मधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने अत्यंत शिताफीने पळवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण परिसरात घुटमळताना दिसत आहे. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री पटताच, अवघ्या काही सेकंदात दुचाकीचे लॉक तोडून त्याने पळ काढला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सीसीटीव्ही असूनही चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. आता घराबाहेर वाहने उभी करायलाही आम्हाला भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

पोलिस तपासाला वेग
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. संबंधित फुटेजमधील संशयिताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून ''हँडल लॉक''सोबतच ''डिस्क लॉक''चा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT