मुंबई

पथविक्रेता धोरण दृष्टीपथात

CD

पथविक्रेता धोरण दृष्टिपथात
निवडणूक प्रक्रिया पार, हक्काच्या जागेची प्रतीक्षा संपणार
वसई, ता. ३० (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात फेरीवाल्यांनी पदपथांवर बस्तान मांडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने फेरीवाले धोरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला असून, रविवारी पथविक्रेत्यांची निवडणूक पार पडली आहे.
वसई-विरार शहर पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत १५ मतदान केंद्रांवर निवडणूक झाली. या मतदान प्रक्रियेत सर्वेक्षणा अंतर्गत अंतिम मतदार यादीत समाविष्ट केलेल्या २,५०१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १,४९४ पुरुष, तर १,००७ महिला मतदारांचा सहभाग होता. प्रभाग समिती सी येथे सर्वात जास्त ५८८ मतदारांनी मतदान केले, तर प्रभाग समिती जी येथे सर्वात कमी १४ मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण गट (पुरुष) दोन जागांसाठी ११ उमेदवार, सर्वसाधारण गट (महिला राखीव) एक जागेसाठी तीन उमेदवार, इतर मागासवर्ग एक जागेसाठी दोन उमेदवार उभे होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने उमेदवाराची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच अ.ज., अल्पसंख्याक व दिव्यांग महिला राखीव पदांसाठी अर्ज आले नसल्याने निवडणूक झाली नाही.
----------------------------------
पालिकेच्या कारवाईतून सुटका
एकीकडे पथविक्रेत्यांना महापालिकेने जागा निश्चित केली नव्हती. त्यामुळे पथविक्रेता शहरातील विविध ठिकाणच्या परिसरात विक्रीसाठी बसत आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने शहराच्या सार्वजनिक ठिकाणी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे पथविक्रेते चिंतेत सापडले. मात्र, आता लवकरच फेरीवाला धोरण निश्चित होणार असल्याने एकाच ठिकाणी व्यवसाय करता येणार आहे.
-----------------
सन्मानाने व्यवसायाची संधी
- वसई-विरार शहरात महापालिकेने फेरीवाला सर्वेक्षण हाती घेतले होते. यात १५ हजार २१५ फेरीवाल्यांची नोंद प्रशासन दप्तरी करण्यात आली. धोरण निश्चित करून, प्रत्येक प्रभागात जागा देण्यात येणार आहे. या जागेवर व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.
- पथविक्रेता समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांना निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांच्यासाठी उपाययोजना तसेच सुविधा प्रशासनाकडून मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून फेरीवाला व्यावसायिकांनादेखील सन्मानाने व्यवसाय करता यावा, अशी भूमिका घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT