कृषी दुतांचा अभ्यास दौरा
वाणगाव (बातमीदार): महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाणगावच्या गुलाबाचा सुगंध दरवळत आहे. या शेतीचे तंत्र अवगत करण्यासाठी आसनगावच्या कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच वाडा तालुक्यातील गालथरे येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला भेट देऊन पर्यावरणाचा आनंद घेतला. शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा अभ्यास दौऱ्यात समावेश होता. कृषी अभ्यासक्रमाचा एक भाग असल्याने दरवर्षी हा उपक्रम करण्यात येतो. यावेळी संचालिका तृप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तंत्र विद्यालयाचे प्रा. दिलीप पवार, प्रा. प्रवीण भोये, प्रा. निशांत कासट उपस्थित होते.