मुंबई

ख्रिस्ती मंदिराच्या इतिहासाला उजाळा

CD

ख्रिस्ती मंदिराच्या इतिहासाला उजाळा
वसई किल्ल्याला शंभरहून अधिक नागरिकांची भेट
वसई, ता. ३० (बातमीदार )ः ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जिज्ञासा लक्षात घेऊन इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी शंभरहून अधिक नागरिकांना वसई किल्ल्यातील ख्रिस्त मंदिराची सफर घडवली. कोळी एकता चॅरिटेबल ट्रस्ट, कोळी एकता मंचच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम झाला.
वसई कोळीवाडा, पाचूबंदर, वसई प्रांतातील १०० हून अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. दुर्गमित्र, कोळी एकता मंच प्रतिनिधी, इतिहासप्रेमी, दुर्गमित्र सहभागी झाले होते. या वेळी ख्रिस्त मंदिराचे वास्तुविशेष, महत्त्वाचे शिलालेख, किल्ल्यातील वास्तूंची संवर्धनाची गरज, त्यामागील इतिहास संदर्भ, जुने नकाशे, आगामी काळातील श्रमदान संवर्धन अशा विषयावर राऊत यांनी संवाद साधला. मोहिमेत उपस्थितांनी किल्ल्यातील न्यायालय, हॉस्पिटल, नगरपालिका, बालेकिल्ला, श्री वज्रेश्वरी देवी मंदिर परिसरातीस अवशेषांचा इतिहास जाणून घेतला. कार्यक्रमाची सुरुवात संत पिटर चर्चचे सहाय्यक धर्मगुरू फादर थॉमस अल्फान्सो यांनी केली. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत, फादर थॉमस अल्फान्सो, आग्नेल दरोग्या, आनंद मस्तान, कोळी एकता मंच अध्यक्ष नाझरेथ मानकर, कोळी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष पिटर तुलो उपस्थित होते.
--------------
श्रमदान मोहिमेची घोषणा
- स्थानिक भाविक मंडळींनी विविध गीते व शुभ वचने संदेशांचे पठण केले. श्रीदत्त राऊत यांनी किल्ला संवर्धनासाठी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. आगामी काळात किल्ल्यातील अगुस्तीयन ख्रिस्त मंदिर, पाण्याच्या विहिरीची आवश्यक स्वच्छतेबाबत श्रमदान मोहीम जाहीर केली.
- किल्ल्यातील ऐतिहासिक ख्रिस्त मंदिरात प्रार्थना करण्यात येते. ऐतिहासिक वास्तूंच्या इतिहासाचे ज्ञान, स्थानिक लोकांमधील चिकित्सा, अभ्यासपूर्ण वातावरणात पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे कोळी एकता मंचचे नाझरेथ मानकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT