मुंबई

आर. के. नगरमध्ये पथदिव्यांचे लोकार्पण

CD

टिटवाळ्यातील आर. के. नगरात लखलखाट
पथदिव्यांचे लोकार्पण; मनसेच्या पाठपुराव्याला यश
टिटवाळा, ता. ३० (वार्ताहर) : आर. के. नगर परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पथदिव्यांचा प्रश्न अखेर सुटला आहे. मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागात पथदिवे बसवण्यात आले असून, विविध नागरी सुविधांची कामेही पूर्ण झाली आहेत. मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.

आर. के. नगरमध्ये पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे या परिसरात असुरक्षिततेचे वातावरण होते. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर पथदिवे कार्यान्वित झाले आहेत. केवळ पथदिवेच नव्हे, तर या उपक्रमांतर्गत परिसरातील इतर समस्यांकडेही लक्ष देण्यात आले आहे. रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आल्याने चिखलातून नागरिकांची मुक्तता झाली आहे. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटार दुरुस्तीची कामेही पूर्णत्वास आली आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक
उद्‍घाटनप्रसंगी प्रकाश भोईर यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. या वेळी त्यांनी शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत आणि वॉर्ड क्र. १० चे उपशाखा अध्यक्ष समीर विष्णू मेस्त्री यांच्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख केला. या सोहळ्याला उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय, सचिन किलजे, अमेय पाटकर, सुहास केळुस्कर यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT