मुंबई

मुलींनो एचपीव्ही लस घ्या

CD

लेकींसाठी कर्करोगाविरुद्धचे तालुक्यात भक्कम कवच!
मोफत लसीकरणासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी प्रभावी एचपीव्ही लस आता शासनामार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. खासगी रुग्णालयांत हजारो रुपये मोजावे लागणारी ही लस आता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य मिळणार आहे. आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी पालकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण मानला जातो. मात्र, योग्य वयात घेतलेली एचपीव्ही लस हा धोका मोठ्या प्रमाणात टाळू शकते. यामुळे भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका टळणार आहे. मात्र, पालकांमधील गैरसमजामुळे लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या २१ दिवसानंतरही पनवेल तालुक्यात दोन हजार ६२७ मुलीपैकी अवघ्या सहा मुलींनी लसीकरण केले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. १४ वर्ष पूर्ण व १५ वर्षांखालील मुलींनाच ही लस देण्यात येते.

पनवेल पालिका क्षेत्राचा आढावा
पनवेल पालिका क्षेत्रामध्ये एकूण पात्र मुलींची संख्या ७,७६९ आहे. पालिका क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाकडून लसीकरणाची जवळपास २०१ सेशन लावण्यात आली होती, यामध्ये अवघ्या ६४ मुलींनी लसीकरण करून घेतले आहे. पनवेल पालिकेच्या आशा वर्कर यांनी मुलींना घरातून आणून लसीकरण केले आहे.

तयार होते प्रतिकारशक्ती
एचपीव्ही (ह्युमन पॅपीलोमा व्हायरस) एक विषाणू असून, यातील ६, ११ प्रकार महिलांच्या जननेंद्रियात गाठी तयार करण्यास, तर १६ व १८ हे प्रकार गर्भाशय कर्करोगाचे कारण ठरतात. या प्रकारातून गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमाण ७० टक्के आहे. त्यामुळे एचपीव्ही मुलींना टोचणे आवश्यक आहे. १४ वर्ष हे साधारण मुलीची मासिक पाळी सुरू झालेली असते. त्यामुळे या काळात ही लस शरीरात प्रतिकारशक्ती तयार करते.

या लसीबाबत पालकांमध्येच भीती दिसून येत आहे. वास्तव हा गैरसमज वैद्यकीयदृष्ट्या खूप चुकीचा आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ही लस तयार झाली आहे. त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लवकर निदान झाले, तर अनेक गंभीर आजारांवर मात करता येते. पनवेल पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत अशा आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट असून, प्रत्येक महिला व कुटुंब निरोगी राहावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
- ममता म्हात्रे, सभापती, महिला बालकल्याण समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT