मुंबई

तृतीयपंथीयांच्या अश्लील हावभावामुळे नागरिक त्रस्त

CD

तृतीयपंथींच्या अश्लील हावभावामुळे नागरिक त्रस्त
पोलिसांकडून कारवाईची मागणी
खारघर, ता. ३० (बातमीदार) : शीव-पनवेल महामार्गावरील बेलपाडा बस थांबालगत रात्रीच्या वेळी तृतीयपंथींकडून होत असलेल्या अश्लील हावभावांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून तरुणांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढल्याने परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बेलपाडा आणि खारघर रेल्वे स्थानकासमोरील महामार्गावर रात्री उशिरापर्यंत तृतीयपंथींचा वावर असतो. या वेळी काही जणांकडून अश्लील हावभाव करून वाहनचालकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. बेलपाडा बस थांब्यावर रात्री बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना या प्रकाराचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांनी रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवून या प्रकाराला आळा घालावा, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. काही बेलपाडा आणि खारघरमधील काही ग्रामस्थ आमदार प्रशांत ठाकूर आणि पोलिस आयुक्तांची भेट घेऊन प्रकार निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले.

परिस्थिती गंभीर
मागील वर्षी कोपरा खाडी पुलालगत या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या स्ट्रायकिंग वाहनावर दगडफेक झाल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी खारघर टोलनाका परिसरातूनही अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी कारवाई करून तृतीयपंथींना तेथून हटवले होते. मात्र, सध्या पुन्हा हा प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोपरा पूल ते बेलपाडा यादरम्यान रात्रीच्या वेळी पोलिस गस्तीवर असतात. तृतीयपंथींचे प्रकार निदर्शनास येताच कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
- संजय जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT