अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या
भोंदू बाबाविरुद्ध खारघरमध्ये महिलांचे आंदोलन
खारघर, ता. ३० (बातमीदार) : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुध्द खारघरमध्ये मराठा समाज आणि प्रगती महिला मंडळाच्या वतीने नवरंग चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खरातला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिलांचे संरक्षण केले जात होते, तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, याची आठवण महिलांनी करून दिली. अशा प्रगत महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण होणे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन करत, ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार नोंदवावी, असेही आवाहनही महिलांनी केले.
या आंदोलनात कालिदास देशमुख, सुनील भोईटे, संजय पवार, महिला मंडळाच्या राजश्री कदम, वृषाली शेडगे, कल्पना माने, मंगल पवार, शकुंतला पाटील, सविता घोडके, संगीता गर्जे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.