मुंबई

भारती विद्यापीठात भविष्यातील कामाचे स्वरूप आणि शिक्षण विषयावर एकदिवसीय परिषद संपन्न

CD

‘भविश्यातील शिक्षणा’वर एकदिवसीय परिषद
खारघर, ता. ३० (बातमीदार) : इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट यांच्या वतीने भारती विद्यापीठात भविष्यातील कामाचे स्वरूप आणि शिक्षण विषयावर एकदिवसीय परिषद शनिवारी (ता. २८) पार पडली. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व सांख्यिकी विभागाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सल्लागार व्ही. व्ही. सूर्य राव उपस्थित होते. या परिषदेचे नेतृत्व डॉ. वैशाली पाटील, डॉ. प्रेमसिश रॉय यांनी केले. या परिषदेत नितुल ओझा, डॉ. रिचा भार्गव, डॉ. निलय याज्ञिक, महेश गंभीर, ममता शर्मा, मृन्मय जाना, रंजना सेन, चारुदत्त पांडे आणि रवी बाविस्कर आदी मान्यवरांनी कामकाज व शिक्षणाचे भविष्य: कृत्रिम बुद्धिमत्ता, रोजगारक्षमता, कल्याण आणि जागतिक बदल या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. कुलदीप भालेराव, डॅनियल कुरियन, नील रमेश, डॉ. वैशाली पाटील, डॉ. एन. महेश, इमॅन्युअल जोसेफ, महेश गंभीर, डॉ. फिलिप कॅसी, डॉ. स्वाती पडोसी, प्रा. अंशुल शर्मा आणि डॉ. नेहा शर्मा यांनी मेहनत घेतली.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT