कंत्राटी कर्मचारी सेवेवर निर्णायक चर्चा
कायमस्वरूपी करण्याबाबत ठराव; १ एप्रिलला महापालिकेची विशेष सभा
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या प्रश्नावर बुधवारी (ता. १) महापालिकेची विशेष सभा होणार आहे. बेलापूर येथील नवीन मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात ही निर्णायक चर्चा पार पडणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मिळालेल्या आश्वासनाची ही पूर्तता असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
दीर्घकाळ कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदसंख्या पुनर्रचना, मंजूर पदांवर एकत्रित अंमलबजावणी, आवश्यकतेनुसार पदसंख्या वाढ यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधितांना कामानुरूप अंतरिम वेतनश्रेणी लागू करण्याचाही विचारही होणार आहे. हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांच्यातर्फे मांडण्यात येणार असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमसेवेत सामावून घेण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच घोषणा केली आहे. वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.