ठाण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : शहरात सोमवारी (ता. ३०) काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. माजिवड्यातील निवासी इमारत आणि ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील मॉलच्या एका हॉटेलमध्ये लागलेल्या या आगींमुळे काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
माजिवडा येथील कृष्ण कोयना सोसायटीच्या ‘बी’ विंगमधील तळ अधिक चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०२ मध्ये सकाळी सुमारे ९.०२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. हे घर अक्षय उतेकर यांच्या मालकीचा असून, येथे श्रीरंग कोळसे भाड्याने राहतात. या आगीत एसी युनिट, बेड व गादी जळून खाक झाली झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले, तर दुसरी घटना दुपारी सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील लक्ष्मी नगर परिसरातील लेक-शॉवर मॉलमध्ये घडली. मॉलमधील ‘इंडियाना वॉटर्स’ या हॉटेलच्या किचन रूममधील चिमणीला आग लागली होती. या घटनेत चिमणीसह शेजारील लाकडी कपाट जळून नुकसान झाले. मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आग आटोक्यात आणली. या दोन्ही घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल व स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी त्वरित प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.