मुरबाड, ता. ३० (वार्ताहर) : तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी ४४ शेतकऱ्यांसाठी पनवेल येथे विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कृषी विभाग मुरबाड यांच्या वतीने हे शिबिर पार पडले. शिबिराचे आयोजन तालुका कृषी अधिकारी संदीप केणे, कृषी अधिकारी प्रशांत जगताप, सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रशिक्षक टीममध्ये आशीष लाड, सायली जंगळे, ऋतुजा शिंदे, साहिल शिंदे, सेंटर व्यवस्थापक विश्वास करपे यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुरबाड कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पिकांचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जलसंधारण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, रोग व कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. या शिबिरात सरळगावचे माजी सरपंच विठ्ठल देशमुख, माणिकराव लांडगे, रत्ना जामघरे, निशा केवारी, सविता शिंदे यांच्यासह एकूण ४४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. शिबिरामुळे आधुनिक शेतीविषयक ज्ञान वाढून उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.