मुंबई

‘प्रेसिडंट चषक इंडियाला’ आजपासून सुरुवात

CD

‘प्रेसिडंट चषक इंडिया’ला आजपासून सुरुवात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अभिनेता सलमान खानच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन

ठाणे, ता. ३० : टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (आयटीसीएसएफ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडंट चषक इंडियाला-२०२६’ या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ मंगळवारी (ता. ३१) ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या उद्‍घाटन सोहळ्याला अधिकच आकर्षण प्राप्त होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकांत शिंदे हे टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयटीसीएफचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘प्रेसिडंट चषक इंडिया’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाना रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्‍घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

--------------------
स्पर्धेत प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी ठेवण्यात आली आहे. दररोज भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी तसेच हजारो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात येणार असून, मालिकावीर खेळाडूला महिंद्रा थार ही कार प्रदान करण्यात येणार आहे, तर सर्वोत्तम खेळाडूला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान विविध विशेष पारितोषिके आणि खास भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

SCROLL FOR NEXT