महापालिका शाळांचे लेखापरीक्षण होणार
दर्जा सुधारण्यावर भर, अर्थसंकल्पात अतिरिक्त १० कोटींची तरतूद
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय सुविधा देण्यासोबतच शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली आहे. मात्र, शाळांचा शैक्षणिक दर्जा तपासण्यासाठी लेखापरीक्षणही केले जाणार आहे.
मिरा-भाईंदर पालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, हिंदी माध्यमांच्या ३६ शाळांमध्ये नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश, वह्या, बूट, दफ्तर असे शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. याव्यतिरिक्त अन्य काही सुविधाही देण्यात येतात. दरवर्षी यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र, त्यानंतरही शाळांच्या शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याच अनुषंगाने शिक्षण विभागासाठी चालू आर्थिक वर्षात ३५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात १० कोटींची वाढ करण्यात आली आहे.
--------------------------
शाळांचे त्रयस्थ व्यक्तीकडून ठराविक कालावधीनंतर शैक्षणिक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येते की नाही, त्यांना शिकवलेले समजते की नाही. त्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.