मुंबई

मँग्रोव्ह स्वच्छता मोहीम यशस्वी

CD

मँग्रोव्ह स्वच्छता मोहीम यशस्वी
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : एनव्हारामेंट लाईफ फाउंडेशनच्या ‘मँग्रोव्ह सोल्जर्स’ तर्फे नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेली मँग्रोव्ह स्वच्छता मोहीम उत्साहात झाली. या मोहिमेला मँग्रोव्ह फाउंडेशन तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक लॉजिस्टिक सहाय्य मिळाल्याचे या स्वच्छता चळवळीचे प्रमुख धर्मेश बराई यांनी सांगितले.
या आठवड्याला डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या ‘अर्थ अवर’च्या २० व्या वर्षाच्या निमित्ताने समर्पित करण्यात आले होते. या उपक्रमामागील मुख्य उद्देश नागरिकांनी अनावश्यक दिवे बंद करून ऊर्जा बचतीची सवय केवळ एका तासापुरती न ठेवता वर्षभर अंगीकारावी, असा होता. एनवोरर्मेन्ट लाईफ फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे मँग्रोव्ह आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
चौकट
जैवविविधतेचे संवर्धन
मँग्रोव्ह हे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तसेच किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. संस्थेचे संस्थापक धर्मेश बराई यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. तसेच नागरिकांनी प्रत्यक्ष सहभागाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाशी जोडावे, स्वच्छता, वृक्षारोपण आणि ऊर्जा बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT