नेरूळमध्ये पदपथावरील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी
महावितरणच्या कामानंतर नागरिकांना अडथळा; महापालिकेकडे निवेदन
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ६ परिसरात महावितरणच्या कामानंतर पदपथावर टाकण्यात आलेले माती व दगडांचे ढिगारे तातडीने हटवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सीव्ह्यू सोसायटी ते मेरेडियन टॉवर तसेच शिवम सोसायटीलगत केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर मातीचे ढिगारे पदपथावरच ठेवण्यात आले आहेत. महिना उलटूनही ते हटवले नसल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.