शतायुषी शिक्षणव्रतीचा गौरव सोहळा
ठाणे, ता. ३० (बातमीदार) : ठाणे शहरातील समृद्ध शैक्षणिक परंपरेत मोलाचा वाटा उचलणाऱ्या श्री समर्थ सेवक मंडळाच्या ज्येष्ठ सभासद आणि शिव समर्थ विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका लीला मोरेश्वर श्रोत्री या एप्रिल २०२६ मध्ये शंभरीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय जीवनप्रवासाच्या निमित्ताने मंडळातर्फे रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणावर विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्रोत्रीबाईंनी सलग पन्नासहून अधिक वर्षे शिक्षणसेवा बजावत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी ठसा उमटवला आहे. या कार्यक्रमात त्यांची ग्रंथतुला करण्यात येणार असून, उपस्थितांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी एक-दोन नवीन पुस्तके देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या ग्रंथतुलेतील पुस्तके आदिवासी भागातील आश्रमशाळांना देण्यात येणार आहेत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.