मुंबई

गॅसटंचाईचा नवी मुंबईत फटका

CD

जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले
गॅसटंचाईचा नवी मुंबईत फटका
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई आणि वाढते दर यामुळे हॉटेल, खाणावळी व्यावसायिक अडचणीत आले असून, सर्वसामान्यांच्या जेवण, नाश्त्याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गॅसपुरवठा विस्कळित असल्याने व्यावसायिकांना वाढीव दराने सिलिंडर घ्यावे लागत आहेत. परिणामी खाद्यपदार्थांच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होत आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्ग रोजच्या जेवणासाठी हॉटेल व मेसवर अवलंबून आहे. दरवाढीमुळे या वर्गाचे मासिक बजेट कोलमडले आहे. काही ठिकाणी नाश्ता आणि जेवणाच्या प्लेटच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर चहा आणि अल्पोपहारदेखील महागला आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅस सिलिंडरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याने मेन्यूतील काही पदार्थ बंद करावे लागले आहेत, तर काही हॉटेलांनी तात्पुरते शटर खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन किंवा कोळशाचा वापर सुरू केला आहे.

काळ्याबाजाराला ऊत
गॅसटंचाईमुळे काळ्याबाजारालाही ऊत आला असून, १,८०० ते २,००० रुपयांचे व्यावसायिक सिलिंडर चार हजार ते पाच हजार रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे लहान विक्रेते आणि हातगाडीधारकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसत आहे. त्यातच तेल, डाळी, मसाले आणि भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याने खाद्य व्यवसायाचे गणित अधिकच बिघडले आहे. गॅसटंचाई आणि महागाईच्या दुहेरी फटक्यामुळे नवी मुंबईतील खाद्यव्यवसाय संकटात सापडला आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ
पदार्थ आधीचे दर आताचे दर
वडापाव १५ २०
भजी ३० ४०
पोहे ३० ४०
उपमा ३० ४०
शिरा ३० ४०
इडली ४० ६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT