मुंबई

जुईनगर गावदेवी मैदानाची दुरवस्था

CD

जुईनगर गावदेवी मैदानाची दुरवस्था
अतिक्रमण, अस्वच्छता आणि पार्किंगमुळे खेळासाठी अडथळे
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या जुईनगर येथील गावदेवी मैदानाची दुरवस्था झाली असून, स्थानिक खेळाडू व नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. परिसरात खेळासाठी पुरेशी मैदाने नसताना या मैदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.
मैदानावर सोसायटी रहिवाशांकडून वाहन पार्किंग करण्यात येत असल्याने मुलांना खेळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. काही वाहने बेवारस अवस्थेत पडून आहेत. तसेच स्वच्छतेअभावी मैदानात कचरा, खड्डे आणि अस्वच्छता दिसून येते. सार्वजनिक शौचालयही नादुरुस्त अवस्थेत बंद आहे. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन शौचालय उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
याशिवाय, येथे बेकायदेशीर आठवडा बाजार भरवला जात असून, अतिक्रमण वाढत आहे. कार्यक्रमांनंतर मैदानाची हानी होत असतानाही कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मैदान अतिक्रमणमुक्त करून मुलांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT