मुंबई

हनुमान जयंतीनिमित्त भक्तिगीतांची मेजवानी

CD

नेरुळगावात भजन महोत्सव
हनुमान जयंतीनिमित्त भक्तिगीतांची मेजवानी
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) : श्री हनुमान जयंती व गावदेवी जत्रेनिमित्त नेरुळगाव येथे आयोजित भव्य भजन महोत्सव भक्तीमय वातावरणात रंगत आहे. श्री शंकर प्रासादिक भजन मंडळ, नेरुळगाव यांच्या वतीने गावदेवी मैदान, सेक्टर-२० येथे हा सोहळा पार पडत आहे. महोत्सवाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. महोत्सवात स्वरांजली महिला भजन मंडळ, स्वरगंध प्रासादिक भजन मंडळ आदी नामवंत मंडळांनी सुरेल सादरीकरण केले. पुढील दिवसांत श्रीपती, शिवतेज व महिला भजन मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत. ज्योती म्हात्रे, चंदना डोंगरे, लिना पाटील यांसारख्या गायक-वादकांच्या सहभागामुळे महोत्सवाला विशेष रंग चढला आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT