मुंबई

मुंबईत रंगला ‘अनहद’ सोहळा

CD

मुंबईत रंगला ‘अनहद’ सोहळा
नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
मुंबई, ता. ३० : भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनंत आणि आध्यात्मिक परंपरेचा अनुभव देणारा ‘अनहद’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. २७ आणि २८ मार्चला ‘एनसीपीए’ नरिमन पॉइंट येथे झालेल्या या कार्यक्रमात बहाउद्दीन डागर, उल्हास कशाळकर, परवीन सुलताना, एन. राजम यांच्यासारख्या नामवंत कलाकारांनी सादरीकरण केले. एसबीआय पेमेंट्स या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते.
हा कार्यक्रम स्पीक मॅके (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिक्ल म्‍युझिक ॲण्ड कल्चर एम्गस्ट युथ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी, संगीतप्रेमी आणि सांस्कृतिक रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून रश्मी मलिक आणि नेहा बंडोपाध्याय यांनी काम पाहिले. पिल्लाई विद्यापीठ, रायन इंटरनॅशनल स्कूल, न्यू बॉम्बे सिटी स्कूल येथील विद्यार्थी स्वयंसेवकांनीही मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल स्पीक मॅकेतर्फे एसबीआय पेमेंट्सचे आभार व्यक्त करण्यात आले.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT