मुंबई

गारगाई प्रकल्पात २६८ कोटींची बचत

CD

गारगाई प्रकल्पात २६८ कोटींची बचत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : स्थायी समितीच्या बैठकीत गारगाई धरण प्रकल्पाचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविल्याने कंत्राटदाराने नरमाईची भूमिका घेत प्रकल्पाचे काम १.९० टक्क्यांत करण्याची तयारी दर्शवली आहे. कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेचे तब्बल २६८.८० कोटींची बचत होणार आहे.

गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. अखेर प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवल्यानंतर अखेर कंत्राटदारांनी एक पाऊल मागे घेतले, ज्या कंत्राटदाराबरोबर तीन वेळा झालेल्या वाटाघाटींत फक्त ५७.७३ कोटी रुपयांची सूट देत हे काम नऊ टक्क्यांमध्ये करण्याची तयारी दर्शवली होती, तिथे स्थायी समितीच्या मागणीनंतर संबंधित कंत्राटदाराने गारगाई धरणाचे काम १.९० टक्क्यांमध्ये करण्यास तयार दर्शवली आहे. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा गारगाई धरणाचा सुधारित प्रस्ताव स्थायी समितीला सादर झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निव्वळ कंत्राटात २६८ कोटींची बचत होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या गारगाई प्रकल्पासाठी सुमारे ६७ मीटर उंच आणि सुमारे ७०० मीटर लांबीचे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट तंत्रज्ञानावर आधारित धरण उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या धरणाचे बांधकाम २.२ मीटर व्यासाचा आणि सुमारे १.६ किलोमीटर लांबीचा जलवहन बोगदा बांधण्यात येणार असून, त्यामध्ये पाच रेडियल गेट्ससह स्पिलवे, स्टॉपलॉग, टर्बाइन तसेच अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि पूल यांचा समावेश असेल.

५,४०० कोटींचा खर्च
गारगाई प्रकल्पातून किमान १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प कामासाठी महापालिकेच्या वतीने सोमा एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली. महापालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा ११ टक्के अधिक बोली लावणारी कंपनी पात्र ठरली असून, या कामासाठी विविध करांसह ५,४०० कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT