मुंबई

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई

CD

अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या निखिल जाधव (वय २७) या सराईत गुन्हेगारावर अंबरनाथ पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
निखिल हा अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या नोंदीवरील हिस्ट्रीशीटर असून, त्याच्यावर जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रे बाळगणे; तसेच परिसरात दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, जामिनावर सुटल्यानंतरही तो पुन्हा गुन्हे करत असल्याचे उघड झाले. त्यामुळे नागरिक त्याच्याविरोधात तक्रार करण्यासही धजावत नव्हते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव परिमंडळ-४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या माध्यमातून आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला २५ मार्चला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, अंबरनाथ पोलिसांनी ३० मार्चला आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निखिलला नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT