मुंबई

‘मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व आहे कुठे?’

CD

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व आहे कुठे?
आठवले यांचा उद्विग्न सवाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः मुंबईत १९९२मध्ये रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यापूर्वी मुंबईचे महापौरपदही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. सध्या पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येत नाही. पक्षाचे अस्तित्व कुठे आहे, असा उद्विग्न सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. याबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतानाच तरुणांना पक्षात प्राधान्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
चेंबूर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार समारंभ आज आयोजित केला होता. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना आठवले बोलत होते. या वेळी बौद्ध धम्मगुरू डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरू आहे. नागालँडसारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. मणिपूरमध्ये पक्षाला १७ टक्के मतदान झाल्याने पक्षाला मान्यता मिळाली. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डांत आपला पाठिंबा नसला तरी मित्रपक्षाचे उमेदवार निवडून येतात. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येऊन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. सर्व समजाला सोबत घेऊन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करा, युती झाली नाही, तर स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद निर्माण करा, असे आवाहनही रामदास आठवले यांनी या वेळी केले. या सत्कार सोहळ्याला दक्षिण मध्य मुंबईतील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT