मंत्रिमंडळ रिॲक्शन
-------------
आज सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन मिनिस्ट्री’च्या मुख्यमंत्रिपदी माझी बहुमताने निवड झाल्याने मला खूप आनंद होत आहे. मागील दोन वर्षांपासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून यिनमध्ये सक्रिय राहता आले. या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व माझ्या मतदारसंघाचे एक व्हिजन घेऊन काम करण्याचा मानस आहे. युवा विकासासाठी भरीव योगदान देईन, हे मी आश्वासन देते. या संधीबद्दल सकाळ यिनचे मनःपूर्वक आभार.
-रिया खानोलकर, यिन मुख्यमंत्री
-------------
आज खरंच खूप छान वाटतंय. खरं तर गेली तीन वर्षे सातत्याने यिन आणि ‘सकाळ’मध्ये कार्यरत असताना अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. अनेक उपक्रम स्वतः आयोजित केले, पार पाडले आणि आज सगळ्यांच्या साथीने मदतीने आणि बहुमताने माझी उपमुख्यमंत्रिपदी निवड केली. खरंच खूप खूप धन्यवाद.
-ओंकार साकोरे-पाटील, यिन उपमुख्यमंत्री
-------------
सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन मिनिस्ट्री अधिवेशना’च्या सभापतिपदाची जबाबदारी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी फक्त पद धारण करणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज बनून काम करणार आहे. नवीन कल्पना, नेतृत्व आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न असेल. यिनच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला संधी, दिशा आणि ताकद देण्याचा माझा संकल्प आहे. आपण सगळे मिळून बदल घडवू आणि एक मजबूत, सक्षम युवा तयार करू!
-समर्थ शिंदे, यिन विधानसभा सभापती
-------------
सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून २८८ विधानसभा सदस्यांमध्ये माझी निवड होऊन विधानसभा उपसभापती म्हणून जबाबदारी मिळाल्याचा मला अभिमान आहे. या व्यासपीठामुळे नेतृत्व, संवाद आणि जबाबदारीचा अमूल्य अनुभव मिळाला.
- शंतनु भावसार, यिन विधानसभा उपसभापती
-------------
आज ‘यिन मिनिस्ट्री २०२६’ची निवडणूक मुंबईमध्ये पार पडली. त्यामध्ये माझी विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदाचा मला अभिमान आहे. या पदाच्या माध्यमातून मी यिनसाठी, विद्यार्थ्यांसाठी चांगले प्रस्ताव विधानसभेमध्ये व त्यासोबतच विविध कार्यक्रम राबवणे तसेच विविध मुद्द्यांवर प्रश्न मांडेल.
-प्रशांत सूर्यवंशी, यिन विरोधी पक्षनेता
------------
आज माझी यिन मिनिस्ट्रीच्या राज्याच्या गृहमंत्रिपदी निवड झाली आहे. ही निवड माझी नसून मला या पदापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी बांधवांची ही निवड आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रभरातून इथे येऊन भरभरून ज्या लोकांनी मतदान दिले आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला ही संधी दिली हे अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याच पद्धतीने यिन अर्थात ‘यंग इन्स्पेक्टर्स नेटवर्क’चे मी मनःपूर्वक आणि मनस्वी आभार मानू इच्छितो. एका सर्वसामान्य घरातून येणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाला आपण ही संधी दिली. नक्कीच या संधी मी सोने करेन आणि महाराष्ट्रभरातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकरिता तत्पर राहील.
- कौस्तुभ पाचडे-पाटील, यिन गृहमंत्री
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.