मुंबई

मिठी नदीचे ९० कोटी रुपये पुलासाठी वळविण्यास विरोध

CD

मिठी नदीचे ९० कोटी रुपये पुलासाठी वळविण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम २००५पासून सुरू आहे. मात्र, मिठी नदीसाठी असलेला निधी उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी वळवण्याचा पायंडा पडेल. त्यामुळे या प्रस्तावाला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात विरोध केला. काँग्रेसनेही उपसूचनेद्वारे या प्रकाराला विरोध केला. विरोधकांच्या विरोधानंतर उपसूचना नामंजूर करीत महापौर रितू तावडे यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने सभागृहात गदारोळ झाला.
आतापर्यंत कुठल्या विभागातील निधी वळता केला याची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी, अशी उपसूचना काँग्रेसचे गटनेते आश्रफ आझमी यांनी सभागृहात केली आणि विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांना पाठिंबा दिला. विरोधकांच्या विरोधानंतर उपसूचना नामंजूर करीत महापौर रितू तावडे यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. पूर्व उपनगरातील सायन पनवेल द्रुतगती मार्गावरील एम पूर्व विभागातील महाराष्ट्र नगर येथे सब-वेजवळील टी जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मिठी नदीच्या कामासाठी असलेला ९० कोटींचा निधी या उड्डाणपुलाच्या कामासाठी वळता करण्यात येणार आहे. मिठी नदीच्या कामासाठी असलेला पैसा का वापरता, असा सवाल करीत विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी प्रस्तावाला विरोध केला. उड्डाणपुलाचे काम होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक विरोध करीत असल्याची टीका भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली. दुसरीकडे ‘९० कोटी रुपये पुलाच्या कामासाठी वळता करण्याचे कारण काय,’ असा सवाल आझमी यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT