मुंबई

निर्बंधामुळे शेतकरी, व्यवसायिक अडचणीत.

CD

शेतकरी, लघु व्यावसायिक अडचणीत
पेट्रोल-डिझेलच्या मुक्त विक्रीवरील निर्बंधांचा परिणाम
तारापूर, ता. ३१ (बातमीदार) ः पेट्रोल-डिझेलबाबतच्या अफवांमुळे जिल्हा प्रशासनाने पेट्रोल, डिझेलच्या मुक्त विक्रीस निर्बंध आणले आहेत, पण या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी तसेच लघु व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
आखाती देशातील युद्धामुळे भारतामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्ततेमुळे नागरिकांनी पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पालघर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर इंधन खरेदीसाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात इंधनाचा कोणत्याही प्रकारे तुटवडा नसल्याचे प्रशासनाला जाहीर करावे लागले. पेट्रोल आणि डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थाची मुक्त विक्रीतून अनुचित घटना घडण्याची शक्यतेमुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी बाटली, कॅनमध्ये सुटे स्वरूपात इंधन देण्यास निर्बंध जारी केले, पण या निर्णयानेमुळे जिल्ह्यातील शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिक, जेसीबी, पोकलेन मालक, जनरेटर व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेतकरी तसेच वीटभट्टी मालकांसाठी व्यवसायासाठी लागणारे डिझेल मिळत नसल्याने व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT