मुंबई

वाधवा बीओटी प्रकल्प सील

CD

१४ कोटींच्या थकबाकीसाठी वाधवा बीओटी प्रकल्प सील
लग्नसमारंभांना मोठा फटका
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कल्याण-डोंबिवली महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. वाधवा बिल्डरच्या वाडेघर जलकेंद्र बीओटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांना सील ठोकण्यात आले असून, यामुळे कोट्यवधींच्या वसुलीचा पेच निर्माण झाला आहे.

महापालिकेने सुमारे १४ कोटी रुपयांच्या प्रलंबित भाड्यापोटी ही कारवाई केली आहे. २०२३ मध्ये नोटीस देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. यात प्रामुख्याने माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन, ग्रीन लीफ हॉटेल या आस्थापनांचा समावेश आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे ऐन लग्नसराईच्या काळात आयोजकांचे धाबे दणाणले आहेत. तर थकबाकी १४ कोटींच्या घरात गेल्याने वाधवा समूहाच्या मालमत्तांवर ही कारवाई केली आहे. वसुली पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महापालिका उपअभियंता जयवंत विश्वास यांनी स्पष्ट केले.

नियोजनाचा फज्जा
माधव बँक्वेट हॉलमध्ये दुसऱ्याच दिवशी ५०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न होणार होते. मात्र, सील लागल्याने आयोजकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हॉलचे संचालक विनोद बारस्कर यांनी सांगितले की, आम्ही वाधवा बिल्डरला नियमित भाडे भरत आहोत, तरीही बिल्डरच्या थकबाकीमुळे आमच्या व्यवसायाला फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

SCROLL FOR NEXT