मुंबई

उष्माघाताचा धोका वाढला

CD

ठाणेकर उन्हाने होरपळले
उष्माघात, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ
ठाणे शहर, ता. ३१ (बातमीदार) : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघात आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिना अद्याप शिल्लक असल्याने आगामी काळात उष्माघाताची लाट येण्याची भीती व्यक्त होत असून, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

एकेकाळी थंड असलेल्या ठाणे शहराचे तापमान वाढण्यामागे मोठ्या प्रमाणावरील नागरीकरण कारणीभूत ठरत आहे. घोडबंदर, कशेळी, भिवंडी आणि मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण तसेच मेट्रोच्या कामासाठी झालेली वृक्षतोड तापमानातील वाढीला कारणीभूत आहे. सिमेंटचे रस्ते आणि वाढत्या वसाहतींमुळे घरातील तापमानातही वाढ झाली आहे. अगदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा घोडबंदर परिसरही आता उष्णकटिबंधासारखा तापू लागला आहे.

उष्णतेमुळे नागरिकांना डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास जाणवत आहेत. लोकमान्य नगरमधील एका तरुणासह, पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या व्यक्तीलाही चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले असून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. भरपूर पाणी, लिंबू सरबत आणि ताक प्यावे. सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा. शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. वृद्ध आणि लहान मुलांना ठराविक अंतराने पाणी देत राहावे, अशा सूचना केल्या आहेत.

उष्माघाताची लक्षणे : चक्कर येणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा कोरडी त्वचा, १०४ पेक्षा जास्त ताप असणे.

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.
-डॉ. श्रीजीत शिंदे, वरिष्ठ डॉक्टर, जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT