मुंबई

गिरणगावातून नाटककार राघवकुमार, तर कथालेखक काशिनाथ माटल कवी नारायण सुर्वे पुरस्काराने सन्मानित

CD

नाटककार राघवकुमार यांचा सन्मान
कथालेखक काशिनाथ माटल यांचाही गौरव

शिवडी, ता. ३१ (बातमीदार) : स्वामीराज प्रकाशनच्या वतीने मराठी भाषा संवर्धनासाठी मागील काही वर्षांपासून ‘आठव दिवस’ साजरा करण्याची संकल्पना राबवली गेली. त्याच कार्याचा एक भाग म्हणून प्रकाशनाने ख्यातनाम साहित्यिक नारायण सुर्वे स्मृतिप्रीत्यर्थ दोन दिवसीय सुर्वे मास्तर अध्याय दुसरे, साहित्य संमेलन प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे लघु सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते नुकतेच या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. या संमेलनामध्ये नाट्यलेखक, दिग्दर्शक के. राघवकुमार यांना संमेलनाचे अध्यक्ष केदार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक किरण तावडेही उपस्थित होते. तसेच अभिनेते प्रमोद पवार, संस्थेचे सर्वेसर्वा रजनीश राणे इत्यादी उपस्थित होते.
संमेलनाच्या अखेरच्या दिवशी नाटककार विजय टाकळे यांच्या हस्ते प्रसिद्ध कथालेखक काशिनाथ माटल यांचा सत्कार करण्यात आला, तर ‘ गांधी टॉल्क’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात अनेक कलावंतांचाही सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT