मुंबई

शिरवलीत ‘हनुमान जन्मोत्सवा’निमित्त रंगणार पारंपरिक लोकनाट्याचा जल्लोष

CD

पारंपरिक लोकनाट्याचा जल्लोष
हनुमान जन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक वारशाची जपणूक

विरार, ता. ३१ (बातमीदार) : वसई तालुक्यातील शिरवली गावात ‘हनुमान जन्मोत्सवा’निमित्त यंदाही सांस्कृतिक उत्सवाची रंगत पाहायला मिळणार आहे. श्री हनुमान प्रासादिक नवतरुण नाट्य मंडळ, शिरवली यांच्या वतीने गुरुवारी (ता. २) रात्री १० वाजता तीन अंकी धमाल विनोदी, तमाशाप्रधान आणि रहस्यमय लोकनाट्य ‘राया... मी डाव जिंकला’ याचे सादरीकरण केले जाणार आहे.
या लोकनाट्यात गावातीलच तरुण कलाकार विविध भूमिका साकारत असून, दौलतराव पाटील, राण्या कोल्हाटी, सावळ्या रामोशी, दिघुभट, सुभान, कृष्णा अशा रंगतदार पात्रांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होणार आहे. सिनेतारका रुचिता जाधव ‘शेवंता उर्फ चांदणी’ या भूमिकेत आकर्षण ठरणार आहेत. विनोदी सादरीकरणासाठी खास ‘बतावणी’चा तडका देण्यात आला असून, संगीत, संवाद आणि अभिनय यांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, शिरवली गावात लोकनाट्याची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. काळाच्या ओघात आधुनिक मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी या पारंपरिक कलेचा वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण काम गावातील हौशी तरुण कलाकार करत आहेत. नव्या पिढीने या कलेत रुची घेत परंपरा जिवंत ठेवण्याचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे.
तसेच शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आलेले रोख बक्षिसांचे जंगी कुस्ती सामनेदेखील येथे पार पडतील. परिसरातील तसेच इतर भागातील कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कुस्तीप्रेमींसाठीही हा कार्यक्रम एक पर्वणी ठरणार आहे. ग्रामस्थ मंडळ, शिरवली यांच्या व्यवस्थापनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सांस्कृतिक परंपरा आणि क्रीडा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT