मुंबई

२२३ कोटींचा प्रस्ताव वादात

CD

२२३ कोटींचा प्रस्ताव वादात
वसई-विरार पालिकेच्या महासभेत गदारोळ
विरार, ता. ३१ (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेच्या विशेष महासभेत गटार बांधकामाच्या तब्बल २२३ कोटींच्या प्रस्तावावरून मोठा वाद झाला. पुरेशी आर्थिक तरतूद नसतानाही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर नियमबाह्य प्रस्ताव रेटून नेण्याचा आरोप विरोधकांनी केला.
पालिका सभागृहातील विशेष महासभेत ११ विषय चर्चेला होते. त्यापैकी प्रभाग समिती ए ते आय अंतर्गत आरसीसी पाइप गटार करण्याकामी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय तसेच वित्तीय मान्यता देऊन ई-निविदा मागवण्याचा विषय होता. मात्र, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रस्तावाला आक्षेप घेतला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात गटार बांधकामासाठी ६० कोटींची तरतूद होती. त्यापैकी ३९ कोटींच्या प्रस्तावांना मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे पालिकेकडे २१ कोटींचीच तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक तरतूद नसताना अशा प्रकारे प्रस्तावांच्या मंजुरीवरून मनोज पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच दोन्ही वर्षांची १११ कोटी शिल्लक असताना दुप्पट रकमेचे प्रस्ताव आणल्यावरून गदारोळ झाला.
----------------------------------
सत्ताधारी-प्रशासनाची तारांबळ
गदारोळानंतर महापौरांनी यापुढे प्रस्तावावर कलमे टाकू नका, अशी सूचना प्रशासनाला केली होती. यावर मनोज पाटील यांनी कडाडून आक्षेप घेत कोणताही प्रस्ताव नियमानुसारच आला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली, पण सत्ताधारी किंवा प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधकांपुढे सत्ताधारी-प्रशासनांची तारांबळ उडाल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.
================================
सभागृहात गटारांच्या प्रश्नावर चर्चा झाली. प्रशासनाने केलेली तरतूद तसेच वसुलीमधून ही कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पाणी, रस्ते, गटार ही कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT