मुंबई

भाविकांच्या मार्गात अडथळे

CD

भाविकांच्या मार्गात अडथळे
विवळवेढे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे कोंडी
कासा, ता. ३१ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी विवळवेढे उड्डाणपुलावरील उंच-खोल रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्ती सुरू केली आहे. मात्र, या कामामुळे महालक्ष्मी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
विवळवेढे उड्डाणपुलावरील मोठमोठे खड्डे, उंचवटे, बाहेर आलेल्या लोखंडामुळे अनेक अपघात घडले होते. यात काहींना जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी होऊन अपंग झाले. वारंवार तक्रारी करून तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. अखेर प्राधिकरणाने रस्ते दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उड्डाणपुलाच्या काही भागावर काँक्रीटीकरण तर तरी काही ठिकाणी डांबरी रस्ता करण्यात आला आहे. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहेत. परिणामी, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने भाविकांना फटका बसणार आहे.
-------------------------------------
नियोजनावर प्रश्नचिन्ह
- दुरुस्तीसाठी उच्च दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून, उंचावलेले डांबर पूर्णपणे काढून नव्याने समतल रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात हा रस्ता अधिक टिकाऊ ठरेल तसेच सुरक्षित असेल, असा दावा केला जात आहे.
- महामार्गावरील विविध कामांसाठी ६०० कोटी रुपये खर्च होऊनही उड्डाणपुलांची अवस्था दयनीय झाली असून, आता यात्रेच्या तोंडावर काम सुरू झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
--------------------------
अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलावरील खराब रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता यात्रेच्या काळातच काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT