मुंबई

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

CD

भोंदूबाबा खरात प्रकरणाचा व्यापक तपास करा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून यामागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भातील पत्र अंनिसने कोकण विभागीय आयुक्तालयाच्या सचिवालय कक्षात सादर केले आहे. या वेळी समितीचे नवी मुंबई येथील पदाधिकारी अशोक निकम, वामन गार्डे, अमोल वानखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली असून, या घटनेकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या स्वरूपात पाहणे योग्य ठरणार नाही. हे प्रकरण सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण आणि बुवाबाजी यांच्या संगनमताचे गंभीर उदाहरण असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. समाजातील भीती, असुरक्षितता आणि वैयक्तिक समस्यांचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे शोषण होत असल्याबाबत समितीने चिंता व्यक्त केली आहे. तसेच अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अनेकदा राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्यामागील संपूर्ण नेटवर्कचा तपास करणे अत्यावश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. यासोबतच अंधश्रद्धाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, पीडित महिलांना संरक्षण द्यावे, अशा मागण्याही अंनिसने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT