मुंबई

विरोधी पक्ष नेत्यांची खारघरला भेट

CD

विरोधी पक्षनेत्यांची खारघरला भेट
जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : खारघरमध्ये ‘विरोधी पक्षनेता जनतेच्या दारी’ उपक्रम अरविंद म्हात्रे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यानुसार नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या दारात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रसंगी नगरसेवक हरेश केनी, तुषार पाटील, शिवसेनेचे कैलास पाटील, नगरसेविका लीला कातकरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्वप्नील पवार उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत खारघर प्रभाग क्रमांक तीनमधील सेक्टर ३४ आणि ३५ परिसरात अरविंद म्हात्रे यांनी भेट दिली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. खारघर सेक्टर ३० ते ३६ परिसर या भागात सिडकोने उद्यान, मैदानसाठी भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, विकसित केले नाही. तसेच या परिसरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यासंदर्भात रहिवाशांनी अनेक वेळा सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले. मात्र, आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. अरविंद पाटील यांनी परिसरात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, सार्वजनिक सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले. काही ठिकाणी नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यासंदर्भात संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने प्रश्न सोडवण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.

खारघर सेक्टर ३४ व ३५ मधील पालिकेच्या आरोग्य केंद्रात रुग्णास सर्व सुविधा उपलब्ध व्हावे. तसेच परिसरातील पाणी समस्येसंदर्भात पालिकेच्या आयुक्त, सिडको अधिकारी आणि महापौर नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पाणीप्रश्न या विषयावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
- अरविंद पाटील, विरोधी पक्षनेता, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT