मुंबई

कुर्ला एल वॉर्डमध्ये नाल्यांची दुर्दशा

CD

कुर्ला एल वॉर्डमध्ये नाल्यांची दुर्दशा
संजय नगर झोपडपट्टीत अस्वच्छतेचे साम्राज्य
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) : कुर्ला येथील एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या संजय नगर झोपडपट्टीत नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. चांद तारा पोलिस चौकीसमोर रस्त्यावर साचलेल्या नाल्याच्या घाण पाण्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात बराच काळ नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा महासचिव मुजीबुर्रहमान सिद्दिकी यांनी सांगितले की, “साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लोकांना अक्षरशः त्या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते. वाढत्या डासांमुळे परिसरात आजारांचे प्रमाणही वाढले आहे.”

पेव्हर ब्‍लॉक उखडले
नाल्यावर टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अनेक ठिकाणी उखडले असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीही मनपा एल वॉर्ड प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाल्यांची तत्काळ साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पालिकेचे म्‍हणणे काय?
एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर म्‍हणाले की, नालेसफाईचे काम सुरू आहे. नाल्यात कचरा टाकण्यास नागरिकही जबाबदार आहेत. या नाल्यात सुमारे ५०० मीटर आत उतरून गाळ काढावा लागतो. नाल्यात कचरा साचल्यामुळे तो भरतो आणि परिणामी घाण पाणी बाहेर येते, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT