मुंबई

रानवली शाळेत खाद्यमहोत्सव

CD

रानवली शाळेत खाद्य महोत्सव
श्रीवर्धन, ता. ३१ (वार्ताहर) : श्रीवर्धन येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत शनिवारी (ता. २८) खाद्य महोत्सव झाला. जंक फूडला आळा बसण्यासाठी आणि कमी खर्चात मुलांना पौष्टिक खाद्य कसे उपलब्ध करून देता येईल व आर्थिक व्यवहार कसे करावे या उद्देशाने शाळेच्या आवारात पालकांनी ३० खाद्य स्टॉल उभारले होते. स्टाॅलवर मोदक, रवा लाडू, मेथी लाडू, शेंगदाणा लाडू, कडधान्य भेळ, इडली हे पदार्थ पालकांनी ठेवले होते. त्याची विक्री विद्यार्थ्यांनी केली. नफा-तोटा, खरेदी-विक्री याचा प्रत्यक्ष अनुभव या वेळी विद्यार्थ्यांनी घेतला.
याप्रसंगी उत्कृष्ट पाककृती बनवणाऱ्या पाच महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात दीपाली पालवे, सानिका मांडवकर, वेदिका मांडवकर, ताई कांबळे व प्रियांका पोतदार यांचा समावेश होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी छत्तीस विद्यार्थ्यांना स्पोर्ट जाकीटचे वाटप केले. तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के उपस्थित असलेल्या अकरा विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव ग्रामपंचायत सदस्य समीर फोपलनकर यांचे सौजन्याने करण्यात आला.
या वेळी रानवली सरपंच ग्रामपंचायत सुरेश मांडवकर, पंचायत समिती उपसभापती पूजा शिंदे, पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे, माजी सभापती बाबुराव चोरगे, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, ग्रामपंचायत सदस्य समीर फोपंलनकर, पत्रकार संदीप लाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कुणाला अडखळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT