मुंबई

प्रत्येक वॉर्डमध्ये समाजमंदिर मोफत उपलब्ध करा

CD

उल्हासनगर, ता. ३१ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नगरसेवक महेश सुखरामाणी यांनी जनहिताशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे ठामपणे मांडत समाजमंदिरांच्या वापराबाबतच्या अडचणींवर लक्ष वेधले. त्यांनी शहरातील समाजमंदिरांच्या वापरासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणारे ५०० रुपयांचे शुल्क पूर्णपणे रद्द करून ही सुविधा सर्वांसाठी मोफत देण्याची मागणी केली.
हे शुल्क गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी आर्थिक ओझे ठरत आहे. त्यामुळे त्यांना सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करताना अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच, प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये किमान एक समाजमंदिर मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच सभागृहाची सुविधा मिळेल, असे त्यांनी नमूद केले. समाजमंदिरासारख्या मूलभूत सुविधांकडे प्रत्येक नागरिकाचा हक्क म्हणून पाहिले जावे, असे सांगत आयुक्त मनीषा आव्हाळे यांना या संदर्भात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सन्मानाने सामाजिक कार्यक्रम करता यावेत, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतर सुखरामाणी यांनी केली.

समाजमंदिरांत दवाखाने सुरू
चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या वॉर्डमधील परिस्थितीही मांडली. नगरसेवक निधीतून सात समाजमंदिरे उभारण्यात आली असली तरी नारायणदास हॉलवगळता इतर ठिकाणी महापालिकेचे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सामाजिक कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध होत नसून, मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT