मुंबई

ठाणे, थोडक्यात बातम्या

CD

ठाणे, थोडक्यात बातम्या

रिक्षा चोरीला
ठाणे : श्रीनगर येथे राहणारे रिक्षाचालक शिवाजी कावळे (६०) यांची श्रीनगर अयप्पा सर्कलजवळ येथे सार्वजनिक रोडकडेला पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २७) समोर आली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
........
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
ठाणे : वागळे इस्टेट परिसरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ६ वाजता नितीन कंपनी नाका येथील तिजादिप प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील घर क्रमांक ७ येथे ही कारवाई करण्यात आली. विष्णू महाडीक, शशिकांत बेहरा, तुकाराम नरे, तुकाराम नामवाड हे जुगार खेळताना, तर महेश वाघूळकर हा जुगार खेळविताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक हजार ९३० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.......…
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे : मैत्रिणीकडे जाऊन येते सांगून गेलेली वागळे इस्टेट परिसरातील एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. तिचा शोध घेऊन ही ती मिळून न आल्याने तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तिच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (ता. २९) घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT