मुंबई

परवाना नसलेल्या चालकामुळे वाहतूक खोळंबा; टेम्पोचालकाविरोधात गुन्हा

CD

टेम्पोचालकामुळे वाहतूक खोळंबा
परवाना नसलेल्या चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३१ : कोपरी येथील आनंदनगर नाका परिसरात परवाना नसलेल्या टेम्पोचालकामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरी शहर वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई विनोद चोरगे हे सोमवारी (ता. ३०) सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत आनंदनगर नाका येथे कर्तव्यावर होते. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गावरील कोपरी पुलाच्या चढणीवर एक टेम्पो बंद अवस्थेत उभा असल्याचे त्यांना आढळले. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी चालकाला आपले वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, टेम्पोमधील डिझेल संपल्याचे सांगत चालकाने क्रेनद्वारे वाहन हटविण्यासही नकार दिला. या वेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालत उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर तपासादरम्यान चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड झाले. संबंधित चालक नसीम सदरुद्दीन खान (वय २२, रा. मानकोली, भिवंडी) हा गेल्या वर्षभरापासून परवान्याशिवाय वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाची कागदपत्रे वैध असली तरी चालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना नव्हता. तसेच अपुऱ्या इंधनामुळे वाहन रस्त्यात उभे राहिल्याने वाहतूक कोंडी झाली. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT