मुंबई

उलवे सी फूड फेस्टिवल २०२६ उत्साहात

CD

उलवे सी-फूड फेस्टिव्हल उत्साहात
मच्छीमारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका
उलवे, ता. ३१ (बातमीदार) : उलवे येथे सी-फूड फेस्टिव्हलचा सोहळा रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडला. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात कोळी समाजाच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत नितेश राणे यांनी गव्हाण, नाव्हा आणि गणेशपुरी या भागांमध्ये नवीन जेट्टी उभारण्याची मागणी मांडली. करंजा बंदरामुळे स्थानिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद करत भविष्यात या परिसरात आशियातील सर्वात मोठे बंदर उभारले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य यांच्यासह अनेक आजी-माजी सरपंच, सदस्य, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक प्रश्नांवर चर्चा
लोकनेते राम ठाकूर यांनी आगरी-कोळी महोत्सवानिमित्ताने मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. स्थानिक नागरिकांच्या जमिनी अत्यल्प दरात घेऊन त्याच नंतर प्रचंड दराने विकल्या जात आहेत ही पद्धत अन्यायकारक आहे. तसेच, कोळीवाड्यांच्या विस्ताराबाबत बोलताना, पारंपरिक गावठाणांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घर बांधताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने अर्थसंकल्पामध्ये वाढ केली आहे. तसेच, उलवे येथे आधुनिक व सुसज्ज मच्छी मार्केट उभारणार आहे. याचबरोबर, १ मेपासून राज्यभर ‘फिश पाव स्टॉल’ ही संकल्पना सुरू करणार असून, यामुळे युवक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
- नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT